फबिंग – फोनसाठी लोकांना डावलणे

आजच्या डिजिटल जगात, हे काही आश्चर्यकारक नाहीये की, लोक इतरांसोबत असताना ही मोबाइल सोबत व्यस्त असतात. जसे की जेवताने, मित्रांसोबत गप्पा मारताने, दिवसभर थकून घरात एकत्र असताने, लोक पूर्णपणे मोबाइल मध्ये हरवून, समोर बसलेल्या व्यक्तींना दुर्लक्षित करतात. हे वर्तन म्हणजेच “फबिंग”
फबिंग म्हणजे काय?
“फोन” आणि “संबिनग”(नाकारणे) या दोन शब्दांच्या संयोगाने फबिंग हा शब्द तयार झाला आहे. आपल्यासमोर असलेल्या व्यक्तीला दुर्लक्षित करून फोनवर लक्ष देणे, प्रत्यक्ष संवादा ऐवजी मोबाईला प्राधान्य देणे. तुम्ही जेव्हा तुमच्या आजुबाजूच्या लोकांशी बोलत असताना फोनवर जास्त लक्ष देता, तेव्हा ते “फबिंग” म्हणून ओळखले जाते.
फबिंग एक साधारण मुद्दा जरी असला तरी, हे एक व्यापक वर्तन आहे ज्यामुळे आपले इतर लोकांशी असलेले व्यक्तीक व व्यावसायिक संबंध बिघडू शकतात. पण हे होत का आणि यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे?

फबिंग होण्याचे कारण काय आहे?
फबिंग हे आपल्या डिजिटल जगाशी संबंधित आहे. आधुनिकीकरणाचा एक मोठा भाग असलेल स्मार्टफोन आणि सोशल मीडिया, ज्यामुळे हे जग जोडले गेलेल आहे. लोकांच्या दिवसेंदिवस वाढत्या वापरणे ते कधी इतके त्यात गुंतून जात आहेत हे त्यांना कदाचित लक्षात ही येत नाहीये, जणू काही मोबाईल जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेक वेळा लोक त्यांचे
फोन सोडून इतरांसोबत संवाद साधण्यात असमर्थ होतात.
तंत्रज्ञानाचे व्यसन
आपण आजच्या काळात, ज्या तंत्रज्ञानाशी जोडले गेलो आहोत, ते खूप आकर्षक आणि व्यसनकारक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यामुळे आपल्याला सतत नवीन नोटिफिकेशन्स मिळतात. ज्यामुळे मजेशीर वेळ घालवता येतो तसेच स्मार्टफोनमध्ये मेसेजेस आणि ईमेल्स वाचण्याचा ऑप्शन असतो. आपल्याला फोन चेक करत असताना एक प्रकारचा आनंद मिळतो, आणि त्यामुळे फोन पाहण्याचे व्यसन लागते.
मिसिंग आऊट (FOMO) चे भय
फबिंग होण्यामागे दुसरे कारण म्हणजे “मिसिंग आऊट” किंवा FOMO (Fear of Missing Out). लोकांना असे वाटते की जर त्यांनी त्यांचा फोन चेक केला नाही, तर काही महत्त्वाचे गोष्टी सुटल्या जाऊ शकतात. त्यांना एखादी महत्वाचा मेसेज, नवीन अपडेट, किंवा एक मजेदार पोस्ट दिसणार नाही. यामुळे त्यांना तात्काळ फोन चेक करण्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे ते समोर असलेल्या व्यक्तींच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात.
सामाजिक कौशल्यांची कमतरता
काही लोकांना कदाचित समजत नाही की ते इतरांसोबत असतानेही, त्यांच फोनवर लक्ष देणे इतरांसाठी कसा नकारात्मक परिणाम करतो. अशा लोकांना संवाद साधण्याचे कौशल्य कमी असू शकतात ज्यामुळे ते ऑनलाईन संदेशांद्वारे बोलण्यात जास्त आरामदायकता अनुभवतात, परंतु प्रत्यक्ष संवाद साधताना ते अडचणीत येऊ शकतात. यामुळे कधीकधी संवेदनशीलता आणि इतरांच्या भावनांची कदर कमी होते.
सोयीस्कर आणि आरामदायक
काही लोकांसाठी फोनवर संवाद करणे, प्रत्यक्ष संवाद पेक्षा सोयीस्कर वाटू शकते. आणि अप्रत्यक्ष संवादात, व्यक्तीला समोरील व्यक्तीचे हावभाव टिपता येत नाही ज्यातून संवादाची औपचारिकता तर पूर्ण होते आणि सोयीनुसार ही प्रतिक्रिया देता येते.

फबिंगचे नकारात्मक परिणाम
फबिंग हा अतिशय साधारण मुद्दा जारी वाटत असेल परंतु त्याचे परिणाम आपल्या संबंधांवर, मानसिक आरोग्यावर आणि संवादावर कौशल्यावर अधिक वाईट होऊ शकतो.

  1. संबंध खराब होणे
    फबिंगचा सर्वात जास्त परिणाम आपल्या व्यक्तिकृत संबंधांवर होतो. कुटुंब, मुलं, मित्र किंवा जोडीदारांसोबत संवाद साधताना, फबिंगमुळे त्यांना अनाकर्षक, महत्वहीन वाटवू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक आपल्याला इतरांकडून अस वर्तन अनुभवतात, अशी लोक आपल्या जोडीदारांसोबत असमाधानी असतात. आणि हे
    सतत होत राहिल्यास नात्यात भावनिक अंतर येऊन ते संपुष्टात येऊ शकत.
  2. मानसिक आरोग्य समस्यांचे वाढते प्रमाण
    जे लोक वारंवार फबिंगचा सामना करतात. त्यांच्या मूलभूत गरजा वारंवार पूर्ण होत नसल्याने याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, इतरांशी नात टिकवताने, जे लोक वारंवार फबिंगचा सामना करतात, ते सोशल मीडिया आणि स्मार्टफोन वापर वाढवू शकतात. मोबाइल फोनच्या व्यसनामुळे, व जास्त वेळ फोन वापरल्याने लोक एकमेकांशी संवाद साधत नसल्याने एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. फबिंग आणि मोबाइल फोन वापरण्याचे व्यसन कधीकधी चिंता, नैराश्य, आणि आत्मसन्मान कमी होण्याचे कारण ठरू शकते.
  3. उत्पादकतेवर व कार्यक्षमतेवर परिणाम
    कामाच्या ठिकाणी ही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेव्हा कामाच्या ठिकाणी लोक फोनवर व्यस्त असतात, तेव्हा ते कार्यावर लक्ष केंद्रित करत नाहीत, मिटिंग्समध्ये, वेगवेगळ्या चर्चांमध्ये कमी भाग घेतात आणि महत्वाच्या गोष्टींचे निर्णय घेत नाहीत परिणामी कार्यक्षमता कमी होते.
  4. सामाजिक कौशल्यांमध्ये घट
    जेव्हा आपण फोनवर जास्त वेळ घालवतो, तेव्हा प्रत्यक्ष संवाद साधण्यात कमी वेळ जातो. त्यामुळे इतरांशी बोलताने त्यांच्या देहबोलीचा अंदाज लावण्यात, ते समजून घेण्याच्या कौशल्यात घट होऊ शकते.
    फबिंग टाळण्यासाठी उपाय
    फबिंग थांबवणे शक्य आहे. जरी आपल्याला फोन चेक करण्याचा मोह असला, तरी त्याचे परिणाम ओळखल्याने बदल घडवता येऊ शकतात. येथे काही उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला फबिंग टाळता येईल:
  5. स्मार्टफोनला विसरा समोरील व्यक्तीच बोलण सक्रिय ऐकणे
    जेव्हा तुम्ही सामाजिक परिस्थितीत असता, तेव्हा काही वेळासाठी फोन बंद ठेवा किंवा बंद करा. समोर असलेल्या लोकांना तुमचे पूर्ण लक्ष द्या. ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत याची जाणीव करून देण्यासाठी, तुमच्या बोलण्यातून देहबोलीतून त्यांना त्याची जाणीव करून द्या. समोरच्याच्या डोळ्यात बघा, हसत उत्तर द्या, आणि त्यांच्या बोलण्यात लक्ष द्या. हे एक छोटासा पण प्रभावी पाऊल आहे.
  6. फोन वापण्यासाठी वेळ मर्यादा ठेवा
    फोन चेक करण्यासाठी विशिष्ट वेळ ठरवा. तुम्ही ब्रेकवर असताना किंवा एकटयात असताना फोन तपासा. जेव्हा तुम्ही इतर लोकांसोबत असता, तेव्हा तुमचा फोन बाजूला ठेवा.
  7. फोन-मुक्त झोन तयार करा
    कुटुंबासोबत जेवताना किंवा मित्रांसोबत गप्पा मारताना फोन-मुक्त क्षेत्र तयार करा. यामुळे आपण एकमेकांशी चांगल्याप्रकारे व जागृतपणे संवाद साधू शकतो.
    निष्कर्ष
    फबिंग हे एक आधुनिक सामाजिक समस्या आहे, ते अधिक प्रमाणात वाढल्याने ज्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. जरी या डिजिटल उपकरणाने जग जवळ येत आहे. कोणतीही माहिती काही क्षणात मिळत आहे ही याची चांगली बाजू असली तरी त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास, इतरांसोबत चांगले संबंध खराब होऊ शकतात अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम व्यक्तिमत्वावर होऊन संवाद साधण्याचे कौशल्य कमी होऊ शकतात. फबिंग टाळण्यासाठी, आपल्याला आपले फोन आणि तंत्रज्ञान वापरण्याच्या पद्धतीला नियंत्रित करण्याची गरज आहे, त्यामुळे आपले जीवलगणसोबतचे व इतरणसोबटचे संबंध अजून मजबूत होऊ शकतात.

Related Blogs

Schedule a Demo

We believe in forming meaningful partnerships with our clients, we listen and respond promptly.